औरंगाबाद - मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. भावसिंगपुरा येथील महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आलेल्या चाचणीत त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर, आज पहाटे आरेफ कॉनलनीतील 60 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 5 वर गेली आहे.
5 एप्रिलला साताऱ्यातील 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरेफ कॉलनीतील वृद्धाचा मृत्यू झाला. यानंतर पुन्हा बिस्मिल्ला कॉलनीतील राहणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. 21 एप्रिलला भावसिंगपुरा येथील वृद्ध महिला, तर 22 एप्रिलला पहाटे आरेफ कॉलनीतील एका वृद्धाचा कोरोनामुळे जीव गेला आहे.
21 एप्रिल रोजी सकाळी भावसिंगपुरा येथील 76 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने या महिलेला 19 एप्रिलला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर स्वॅब टेस्टींगसाठी देण्यासाठी देण्यात आले. मात्र, महिलेचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. दरम्यान मंगळवारी संबंधित महिलेचा मृत्यू झाला. सायंकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर बुधवारी पहाटे आरेफ कॉलनीत राहणाऱ्या एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना देखील 19 तारखेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. चोवीस तासात दोन जणांचे मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात मृतांची संख्या 5 वर गेली आहे. तर 18 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
'तो' चालक सापडला
10 एप्रिल रोजी मुंबईहून गर्भवती महिला शहरात दाखल झाली होती. या महिलेसह तिच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले. त्यांना घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाची तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, संबंधित चालक फरार असल्याने त्याचा शोध घेण्यात येत होता.
#CORONA: औरंगाबादेत चोवीस तासात दोघांचा मृत्यू; चिंतेत भर.. - aurangabad corona news
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. भावसिंगपुरा येथील महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आलेल्या चाचणीत त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर, आज पहाटे आरेफ कॉनलनीतील 60 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय.
औरंगाबादेत चोवीस तासात दोघांचा मृत्यू; चिंतेत भर..
हा चालक अखेर सापडला असून आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या चालकाची तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे.