औरंगाबाद - आई-बाबा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं, मात्र मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. त्यासाठी सॉरी अशा आशयाची सुसाईड नोट लिहून औरंगपुरा भागातील 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घे.ऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे किर्ती उदय जोशी (वय 19 रा. औरंगपुरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
औरंगपुरा भागातील 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या - औरंगपुरा तरुणीची आत्महत्या
आई-बाबा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं, मात्र मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. त्यासाठी सॉरी अशा आशयाची सुसाइड नोट लिहून औरंगपुरा भागातील 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घे.ऊन आत्महत्या केली.
किर्ती ही वाळूज परिसरातील औषध निर्माण-शास्त्र विभागात दुसऱ्या वर्षात शिकत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने ती ऑनलाइन क्लासेससाठी शुक्रवारी तिच्या खोलीत गेली. ऑनलाइन क्लास सुरू असल्यामुळे अडथळा येऊ नये. यासाठी घरच्यांनी तिला आवाज दिला नाही. मात्र बराच वेळ झाल्यानंतर किर्ती बाहेर न आल्याने घरच्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र प्रतिसाद आला नाही. या वेळी खाली डोकावून बघितले असता किर्तीने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
यावेळी तत्काळ किर्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत तिची मृत्यू झाला होता. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.