अमरावती :तिवसा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी लक्षात ठेवा मी तुमच्याकडून एक पैसाही घेत नाही. त्यामुळे कॉलिटीचे काम झाले नाही, तर मी तुमचे डोके फोडेन, असा दम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिला.
असे आहे संपूर्ण प्रकरण :तिवसा तालुक्यात येणाऱ्या तिवसा वरुडा सुरवाडी मिर्झापूर निंभोरा बेलवाडी आणि आमदाबाद आदी ठिकाणी पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची यशोमती ठाकूर यांनी पाहणी केली. तसेच, या परिसरात रस्त्यांच्या कामासाठी 44 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. वरखेड मार्डी या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना तेथे उपस्थित कनिष्ठ अभियंता यशोमती ठाकूर यांनी या भागातील सर्व रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत खंत व्यक्त करीत नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांवर जर खड्डे पडले, तर तुमच्या डोक्यात दगड घालेन, अशा शब्दांत दम दिला.
प्रज्ज्वला योजना चौकशीची केली होती मागणी : राज्य महिला आयोगाची प्रज्ज्वला योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. या योजनेच्या निधीबाबत अनियमिता आढळून आली आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली जाणार आहे, अशी ग्वाही महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधान परिषदेत दिली होती. तसेच, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांचीदेखील चौकशी केली जाणार असल्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
आरोग्य विभागाला केल्या होत्या सूचना :आरोग्य आणि पोषण विषयांमध्ये जागृती करून आहार आणि आरोग्य विषयक सवयींमध्ये मूलगामी बदल करण्यासाठी पोषण अभियान सर्व स्तरावर राबविले जाते. कुपोषण निर्मूलनाची वार्षिक उद्दिष्टे निश्चित करून शासनाच्या विविध विभागांमधील अभिसरण पद्धतीने ही उद्दिष्टे साध्य करण्याबाबत कार्यवाही केली जाते. महिला आणि बालविकास विभाग पोषण अभियानात नोडल विभाग म्हणून कार्य करतो. तर नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग सार्वजनिक, आरोग्य विभाग हे पोषण अभियानाचा एक भाग आहेत. समाजामध्ये आहार आणि आरोग्य विषयासंदर्भात जनतेमध्ये जनजागृती व्हावी, स्वच्छतेचे भान निर्माण व्हावं आणि आरोग्याची चळवळ उभी व्हावी, यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम शासनाच्यावतीने आयोजन केले जातात.
हेही वाचा :Threats To Katrina and Vicky : अभिनेत्री कॅटरिना आणि तीचा पती विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी