अमरावती - जिल्ह्यातील तळीरामांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यत गुरुवारपासून मद्यविक्रीला सुरुवात होणार आहे. बार मात्र बंदच राहणार आहेत. हा निर्णय केवळ ग्रामीण भागासाठी आहे.
तळीरामांसाठी खुशखबर.. अमरावतीत गुरुवारपासून मद्यविक्री होणार सुरू
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन असल्याने मद्यविक्रीही बंद होती. राज्यातील अनेक जिल्ह्यात मद्यविक्रीला सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यात मात्र मद्यविक्रीवरील बंदी कायम होती.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन असल्याने मद्यविक्रीही बंद होती. राज्यातील अनेक जिल्ह्यात मद्यविक्रीला सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यात मात्र मद्यविक्रीवरील बंदी कायम होती.
मंगळवारी पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी या संदर्भात जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना पत्र पाठविले आहे. शासनाच्या अटी व शर्तीनुसार मद्य विक्रेत्यांना गुरुवारपासून दुकान उघडता येणार आहेत. मद्य विक्रेत्यांना त्यांच्या दुकानासमोर बॅरिकेट्स लावावे लागणार आहे. सोशल डिस्टनची काळजीही घ्यावी लागणार आहे. मद्यविक्री दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही वाढवला जाणार आहे.