महाराष्ट्र

maharashtra

रानफुलांनी बहरले अमरावती शहरालगतचे जंगल, वाचा सविस्तर...

By

Published : Sep 14, 2020, 3:39 AM IST

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावासामुळे शहरालगत असलेले जंगल बहरले आहे. याच जंगलात विविध रानफुलांना बहर आला आहे. यात अनेक फुलांचा समावेश असून यांचा औषधी उपयोग देखील आहे.

रानफुले
रानफुले

अमरावती - शहरी भागात विविध फुलांच्या बागा तसेच अनेक उद्यानांमध्ये विविध रंगी फुले पाहायला मिळतात. बागेत किंव्हा उद्यानात दिसणाऱ्या फुलांपेक्षाही सुंदर, विविध रंगी आणि आकरांसह पक्षी, पाखरांसोबतच मानवासाठीही उपयुक्त असणारी रानफुले अमरावती शहरालगतच्या जंगलात सध्या बहरली आहेत. पावसाळ्यामुळे संपूर्ण वातावरण ओलेचिंब झाले असताना छत्री तलावामागे असणाऱ्या जंगलात भारंगी, कळलावी, रान झेंडू, खैर, बाभूळ, हिवर, गवती फुले असे विविध रंगी आणि विविध आकारांची फुले सद्या पाहायला मिळत आहेत.

रानफुलांनी बहरलेले जंगल

भारंगी ही एक औषधी वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव क्लोरोडेनड्रोन सेरॅटम असून तिला रथीका सराटा या शास्त्रीय नावानेही ओळखले जाते. महाराष्ट्रात सातपुडा आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये ही आढळते. वात नाशक असणाऱ्या भारंगीला इंग्रजी भाषेत 'ब्ल्यू फाऊंटन बुश' असेही म्हणतात. फक्त पावसाळ्यातच तिला सुंदर फुले येतात. यासोबतच जंगलात सद्या लाल-पिवळा रंग असणारी कळलावीची फुले सुद्धा बहरलेली दिसतात. सुलभ प्रसूतीसाठी आदिवासी आणि पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये या झाडाच्या मुळाचा लेप बाल्टिणीच्या ओटीपोटावर लावला जातो. प्रसूतीच्या वेळी बाळंतीणीला कळा आणण्यासाठी या वनस्पतीचा वापर होत असल्यामुळे तिला कळालावी असे म्हणतात.

हेही वाचा -वडाळी उद्यानाच्या तिकीट घरातून दारू विक्री; पोलीस आयुक्तांकडे तक्रारी करूनही कारवाई शून्य

कळलावीच्या फुलांच्या पाखळ्यांची टोके तांबडी व मधला भाग पिवळा असल्याने त्याकडे पाहून अग्नीज्वाला असल्याचा भास होतो. अग्निज्वालेप्रमाणे असणाऱ्या फुलांच्या पाखळ्या दुरून समईत ज्योती तेवल्याप्रमाणे दिसतात, म्हणूनच या वनस्पतीला 'अग्निशिखा' असेही म्हणतात. पावसाळा वगळता इतर ऋतूत या वनस्पतीचे कंद जमिनीत जिवंत असतात. पाऊस पडला की सर्व कंद रुजतात जमिनीवर आपल्या माना वर काढतात. महिनाभरात या वेळी पसरतात आणि पाहता पाहता फुलांनी बहरून जातात. अग्निशिखाचे कंद व संपूर्ण झाड हे अतिविषारी असून ते खाल्याने माणसाचा मृत्यूही होतो. या प्रजातीतील काही कंद हे औषधी उपयोगाचे आणि खाळण्यायोग्य असले तरी त्यावर प्रक्रिया करावी लागते. ही वनस्पती सध्या अमरावती शहरालगत बहरली असून तिचे लाल-पिवळे फुल प्रत्येकाला आकर्षीत करत आहेत.

यासोबतच अतिषय नाजूक आणि आकर्षक खैरची फुले, रान झेंडू, हिवर आणि बाभळीची फुले जंगलात बहरली आहेत. अगदी जमिनीवर दिसणारे पिवळ्या रंगाचे सुंदर गवती फुल म्हणजे निसर्गाची किमयाच. अतिशय आकर्षक असणारे हे नाजूक फुल पहाडावर पाहायला मिळतात. सद्या बहरलेली ही सर्व फुल पावसाळा संपला की दिसत नाही. निसर्गाच्या तक्रार पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात जंगलामध्ये विविध प्रजातींची फुलं येतात. या सगळ्या फुलांच्या पराग कणांवर अनेक पक्षी, पकरांचे उदर अवलंबून असते.

हेही वाचा -पदवी प्रवेशाचे करायचे काय? राज्यातील विद्यापीठांपुढे संभ्रम कायम...

ABOUT THE AUTHOR

...view details