अमरावती : ईदनिमित्त रविवारी परतवाडा शहरात काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये आक्षेपार्ह गाणे वाजल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यासंदर्भात सोमवारी रात्री आठ ते दहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मंगळवारी सकाळी दोघांना अटक केली ( two person arrest in paratwada due to play offensive song ) आहे तसेच इतरांचा शोध सुरू असल्याचे परतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष टाले ( police inspector santosh tale ) यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
Amravati crime : जुलूसमध्ये आक्षेपार्य गाणे वाजविल्या प्रकरणी दोघांना अटक, परतवाडा येथे तणावपूर्ण शांतता - arrested in paratwada
ईदनिमित्त रविवारी परतवाडा शहरात काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये आक्षेपार्ह गाणे वाजल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यासंदर्भात सोमवारी रात्री आठ ते दहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मंगळवारी सकाळी दोघांना अटक केली ( two person arrest in paratwada ) आहे. तसेच इतरांचा शोध सुरू असल्याचे परतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष टाले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे तणाव - परतवाडा शहरात रविवारी दुपारी महावीर चौक पेन्शनपुरा परिसरात ईद निमित्त निघालेल्या जुलूस मध्ये ' सर तन से जुदा ' अशा आशयाचे गाणे वाजवले ( played offensive song ) गेले. यासह या आशयाच्या घोषणा देखील देण्यात आल्या. या प्रकरणात पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याप्रकरणी शेख राहील आणि शेख हशम कादर या दोघांना मंगळवारी पहाटे अटक केली. या प्रकरणात इतर आठ ते दहा जण अद्यापही फरार आहेत. त्यांना सुद्धा लवकर पकडण्यात येईल असे परतवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष टाले ( police inspector santosh tale ) 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
शहरात तणावपूर्ण शांतता - इच्छा जुलूस मध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा घोषणा देण्यात आल्या तसेच गाणेही वाजवण्यात आले. या प्रकारामुळे परतवाडा आणि लगतच्या अचलपूर शहरात रविवारी तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता तिकडे यांनी या प्रकरणात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तसेच खासदार अनिल मुंडे ( MP Anil munde ) यांनी देखील या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली होती. पोलिसांनी घटनेची तत्काळ दखल घेत दोघांना अटक केली असून परतवाडा येथील संवेदनशील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या परतवाड्यात तणावपूर्ण शांतता आहे.