अमरावती - अखिल विश्वाला मानवतेचा संदेस देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५१व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्ताने मोजरी गुरुकुंज येथे दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी भावपूर्ण क्षद्धांजली वाहण्यात आली. या वेळी देशासाठी शहीद झालेल्या वीज जवानांना ही श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला योगगुरू रामदेवबाबा यांच्यासह तुकडोजी महाराजांच्या लोखो भक्तांनी विशेष उपस्थिती लावली होती.
लाखो गुरुदेव भक्तांनी साश्रुपूर्ण नयनांनी वाहिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली - मोजरी गुरुकुंज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५१व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्ताने मोजरी गुरुकुंज येथे भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला त्यांचे हजारो भक्तांनी उपस्थिती लावली.
तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवार पासून देशाच्या कानाकोपऱ्यातुन हजोरो पालख्यांसह भक्त मोजरीत दाखल झाले होते. दुपारी तीन वाजता पासून हृदयस्पर्शी अशा मौन श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली होती. यावेळी भजनातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे विचार हे मांडले गेले. त्यानंतर दुपारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी लाखो गुरुदेव भक्तांनी आपल्या गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना दोन मिनिटं स्तब्ध होऊन महाराजांना श्रध्दांजली वाहिली. देशाच्या रक्षणासाठी ज्या जवानांनी आपले बलिदान दिलें अशा सर्व वीर जवानांना सुद्धा मौन श्रद्धांजली वाहिली गेली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर सर्वधर्म समभावाची शिकवणं दिल्याने मौन श्रध्दांजली नंतर हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शिख, पारशी,जैन, इसाई आदी धर्माच्या प्रार्थनाही येथे झाल्या. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेवर योगगुरू रामदेव बाबा आपले विचार मांडले.