महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अमरावतीत तुतीयपंथीयांचा आत्मदहनाचा प्रयत्न

असली नकली तृतीयपंथी असल्याच्या संशयावरून तृतीयपंथी यांनी दोन तरुणांना नग्न करून त्यांच्या डोक्याचे केस कापून त्यांना नग्न अवस्थेत नृत्य करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

transgenders
तुतीयपंथीयांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By

Published : Mar 26, 2021, 5:34 PM IST

अमरावती -असली नकली तृतीयपंथी असल्याच्या संशयावरून तृतीयपंथी यांनी दोन तरुणांना नग्न करून त्यांच्या डोक्याचे केस कापून त्यांना नग्न अवस्थेत नृत्य करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. आज अमरावतीच्या इर्विन चौकात तृतीयपंथीयांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होत असल्याने आंदोलनकर्त्याना पांगवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलन चिघळले आहे. तेव्हा तृतीयपंथीयांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

हेही वाचा -पुण्यातील लॉकडाऊनबाबत 2 एप्रिलला होणार निर्णय

तृतीयपंथीयांचे आंदोलन

दरम्यान, तरुणांना मारहाण प्रकरणी अमरावतीच्या युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष पैलवान योगेश गुडधे यांनी अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली. ज्यांनी हे कृत्य केलं हे तृतीयपंथी नकली असून अशा या बनावट तृतीयपंथीयांवर कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संतप्त तृतीयपंथींनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेत पोलीस आयुक्त आरती सिंग यांना निवेदन दिले. युवा लॉयन्स ग्रुप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. कारण आम्ही नकली तृतीयपंथी नसून आमची या माध्यमातून बदनामी केली जात आहे. त्यामुळे या संघटनेवर कारवाई करण्याची मागणी यावेळी तृतीयपंथीयांनी केली होती. त्यामुळे आज अमरावतीच्या इर्विन चौकात तृतीयपंथीयांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होत असल्याने आंदोलनकर्त्याना पांगवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलन चिघळले आहे. तेव्हा तृतीयपंथीयांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अद्यापही आंदोलन सुरूच आहे, योगेश गुडधे या युवकाने माफी मागावी ही मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.

हेही वाचा -5 एप्रिलपर्यंत थकित 'एफआरपी' न दिल्यास कारखानदारांना धडा शिकविणार - राजू शेट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details