महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 18, 2019, 8:27 AM IST

ETV Bharat / city

भीम ब्रिगेड अध्यक्षाचा आत्महत्येचा प्रयत्न; आमदार रवी राणा विरुद्ध कुटुंबीयांची तक्रार

राजेश वानखेडे यांनी रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर राजेश वानखेडे यांच्या पत्नी जागृती वानखडे यांनी आमदार रवी राणा आणि त्यांचे सचिव अश्विन ओके यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.

राजेश वानखेडे

अमरावती - 'भीम ब्रिगेड'चे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखेडे यांनी रविवारी दुपारी इरविन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विष प्राशन पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने त्यातून ते बचावले आहेत. दरम्यान, आमदार रवी राणा आणि त्यांच्या जुन्या सचिवांकडून मिळणार्‍या वागणुकीमुळे राजेश वानखेडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार वानखडे यांच्या कुटुंबीयांनी गाडगेनगर पोलीस स्थानकात दिली आहे.

रुग्णालयातील दृष्ये

राजेश वानखेडे यांनीरविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राजेश वानखडे यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर राजेश वानखेडे यांना राधानगर स्थित खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा -महाशिवआघाडीबाबत अद्याप काही ठरलं नाही, १९ नोव्हेंबरनंतरच निर्णय - अजित पवार

राजेश वानखडे हे आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते होते. काही वर्षांपूर्वी राजेश वानखेडे यांनी रवी राणा यांच्यापासून विभक्त होऊन 'भीम ब्रिगेड' नावाची स्वतंत्र संघटना स्थापन केली. विधानसभा निवडणुकीदरम्यान राजेश वानखेडे यांनी आमदार रवी राणा यांच्यासाठी काम केले नसल्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. याबाबत राजेश वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या होत्या. अशी माहिती राजेश वानखडे यांच्या कुटुंबीयांनी दिली.

हेही वाचा -शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर

या घटनेनंतर राजेश वानखेडे यांच्या पत्नी जागृती वानखडे यांनी आमदार रवी राणा आणि त्यांचे सचिव अश्विन ओके यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details