महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक ! अमरावतीत पुन्हा एका ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार - six year girl physically abused in amravati

धामणगाव रेल्वे येथे एका सहा वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

six year girl physically abused in dhamangaon railway
अमरावतीत ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

By

Published : Jan 7, 2020, 4:10 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर येथे काही दिवसांपूर्वी सख्या काकाने आपल्या 9 वर्षीय पुतणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच, धामणगाव रेल्वे येथेही एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... भाजपच्या राजकारणात विद्यापीठे रक्ताने भिजली, जेएनयूवरून सेनेचा मोदी-शाहांवर निशाणा

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात राहणारी ही पीडित चिमुकली तिच्या घराजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपी नागेश कुरील याने तिला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी तिच्या घरी गेली असता, घरी तिच्या आईला हा सर्व प्रकार समजला. यानंतर मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नागेश कुरील याला अटक आहे. मागील ३ दिवसात अमरावती जिल्ह्यात बलात्काराची हा तिसरी घटना समोर आल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा... 'हे फसवं सरकार, वरपासून खालपर्यंत सगळेच खोटारडे', अनुराग कश्यप भडकला

ABOUT THE AUTHOR

...view details