महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rana Vs Shivsena : रवी राणा यांनी आंदोलन मागे घेतल्याचे कळताच शिवसैनिकांनी अमरावतीत केली फटाक्यांची आतषबाजी - नवनीत राणा ताज्या बातम्या

आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर ( MLA Ravi Rana ) शिवसैनिक जमले असताना आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाणार नाही, अशी माघार घेतल्याची माहिती अमरावती धडकताच राणा यांच्या घरासमोर घेऊन बसलेल्या शिवसैनिकांनी फटाक्यांची ( Shivsainiks Set off firecrackers ) आतषबाजी केली.

Rana Vs Shivsena
Rana Vs Shivsena

By

Published : Apr 23, 2022, 7:57 PM IST

अमरावती -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि बडनेराचे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) मुंबईला मातोश्रीवर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) पठणासाठी गेले असताना त्यांना पोलिसांनी घराबाहेर पडू दिले नाही. तसेच त्यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमले असताना आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाणार नाही, अशी माघार घेतल्याची माहिती अमरावती धडकताच राणा यांच्या घरासमोर घेऊन बसलेल्या शिवसैनिकांनी फटाक्यांची ( Shivsainiks Set off firecrackers ) आतषबाजी केली.

शिवसैनिकांचा ठिय्या -मुंबईला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे जोपर्यंत मातोश्रीची माफी मागणार नाही, तोपर्यंत ज्याप्रमाणे मुंबईची शिवसैनिक राणांच्या घरासमोर ठाण मांडून आहे. अगदी त्याच प्रमाणे अमरावतीत रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांचा ठिय्या दिला होता.

फटाक्यांची आतषबाजी

शिवसैनिकांनी केले हनुमान चालीसा पठण -राणा यांच्या घरासमोर जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी हनुमान चालीसा पठण केले. आम्हाला हनुमान चालीसा तोंडपाठ आहे, अशी हनुमान चालीसा खासदार नवनीत राणा यांनी म्हणून दाखवावी, असे आव्हान देखील शिवसैनिकांनी यावेळी दिले.

हेही वाचा -Navneet Rana Arrest : मुंबई पोलिसांसमोर नवनीत राणा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींना म्हणाल्या...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details