स्थलांतरीत असलेली ७ युवक मजूर पळाले, अमरावतीच्या तिवसा येथील प्रकार - AMRAVATI LABOUR
जालना येथील एका कंपनीत काम करणारे ११ युवक मजूर आपल्या गावी गोंदिया येथे चालत जात असताना त्यांना तिवसा येथे अधिकारी यांनी ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते.
स्थलांतरीत असलेली ७ युवक मजूर पळाले, अमरावतीच्या तिवसा येथील प्रकार
अमरावती- जालना येथून गोंदिया जिल्ह्यातील आपल्या गावी जाणाऱ्या ११ मजूर युवकांना प्रशासनाने ताब्यात घेऊन अमरावतीमधील तिवसा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवले होते. दरम्यान, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास यातील सात मजुरांनी शाळेच्या छताचे छत फोडून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.