महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sant Gadge Baba University : अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन; यंदा पुरवणी उत्तरपत्रिका बाद - संत गाडगेबाबा विद्यापीठ मराठी बातमी

कोरोनानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार ( Sant Gadge Baba University exam offline ) आहे. एकूण प्रश्नांपैकी केवळ पन्नास टक्केच प्रश्न सोडवायचे असल्यामुळे परीक्षेतून पुरवणी उत्तर पत्रिका बाद करण्यात आली ( Supplementary Answer Sheets Dropped ) आहे.

Sant Gadge Baba University
Sant Gadge Baba University

By

Published : Apr 21, 2022, 7:53 PM IST

अमरावती - कोरोनानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार ( Sant Gadge Baba University exam offline ) आहे. यंदा विद्यार्थ्यांना एकूण प्रश्नांपैकी केवळ पन्नास टक्केच प्रश्न सोडवायचे असल्यामुळे परीक्षेतून पुरवणी उत्तर पत्रिका बाद करण्यात आली आहे. यामुळेच आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पुरवणी उत्तरपत्रिका दिली जाणार ( Supplementary Answer Sheets Dropped ) नाही.

विद्यापीठाच्या परीक्षा मार्च महिन्यात सुरु होत असून, मेच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत परीक्षा संपते. यंदा कोरोना काळानंतर परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला नव्याने नियोजन करुन आखणी करावी लागली. त्यामुळे आता उन्हाळी 2022 ही परीक्षा 27 एप्रिल पासून सुरु होणार असून, अभियांत्रिकी व तांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 17 मे ते 31 मे दरम्यान होतील. तर, लेखी परीक्षा 23 मे ते 2 जून याकाळात होणार आहे.

अशी होणार प्रात्यक्षिक परीक्षा -प्रात्यक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाह्य परीक्षक नियुक्त करुन घेण्यात येणार आहे. बाह्य परीक्षक निवडीचे अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्यांना राहणार आहेत. बाह्य परीक्षकांना गुण सादर करताना विद्यापीठाचे गुण सादर करावे लागणार आहे. प्रकल्प परीक्षांमध्ये केवळ मौखिक परीक्षा असणार आहे. त्यासाठी सुद्धा बाह्य परीक्षक नियुक्त केले जाणार आहे.

परीक्षेचा कालावधी एक तासांचा -महाविद्यालयीन स्तरावर संचालित होणाऱ्या परीक्षा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमांवर आधारित प्रत्येक युनिटवर साधारणतः समान संख्येने बहुपर्यायी स्वरूपात 39 प्रश्न राहतील. त्यापैकी सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना सोडविणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी दोन गुण राहतील. परीक्षेचा कालावधी हा प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी एक तासांचा राहणार आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपात सोडवायची असून, चुकीच्या उत्तरांना निगेटिव्ह मार्किंग पद्धत यावेळी राहणार नाही. महाविद्यालयीन स्तरावर संचालित होणाऱ्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन महाविद्यालयातच गोपनीयता राखून केले जाणार आहे.

हेही वाचा -Krishna Prakash Transferred : 'कृष्ण प्रकाश' यांची उचलबांगडी; 'हे' असतील नवे पोलीस आयुक्त

ABOUT THE AUTHOR

...view details