अमरावती -चळवळीतून बाजूला होऊन छातीवरील लाल बिल्ला काढून शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्यांना संघटनेत थारा नाही. आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिनानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात हिवरखेड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत थारा नाही : राजू शेट्टी - माजी खासदार राजू शेट्टी
चळवळीतून बाजूला होऊन छातीवरील लाल बिल्ला काढून शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्यांना संघटनेत थारा नाही. आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिनानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
raju shetty
'देवेंद्र भुयार यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जागा सोडवून घेण्यासाठी मी महाविकास आघाडी तोडण्याची भूमिका मांडली होती. त्यावेळी बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भुयार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. याच्याकडे काय बघून तुम्ही जागा सोडवून घेत आहात, असे स्वत: पवार बोलले होते. पण मी मात्र भुयार यांच्या जागेसाठी शेवटपर्यंत ठाम राहिलो. यांना आमदार करण्यासाठी खर्च सगळा मी उचलला. माझं घर विकून मी निधी दिला. पक्षाकडून ऑन रेकॉर्ड पक्षनिधी दिला. छपाई सर्व कार्यालयातून केली. एवढं सगळे करून देखील यांच्या छातीवरील लाल बिल्ला गायब झाला. निवडून आल्यावर १५ दिवसात भुयारांची भूमिका बदलली. स्वाभिमानीच्या कोणत्याही बैठकीला निरोप देऊन देखील हजर राहिले नाहीत. संघटनेच्या विरोधी भूमिका वेळोवेळी घेतली. चळवळीशी व शेतकाऱ्यांशी बेईमानी करणाऱ्याला संघटनेत स्थान नाही. म्हणून मी यांची हकालपट्टी करत आहे. मोर्शीच्या जनतेची मी माफ मागतो. मी तुम्हाला चांगला माणूस दिला नाही. भुयार हे स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांनी त्वरीत आमदारकीचा राजीनामा देऊन स्वत:च्या जीवावर निवडून येऊन दाखवावे,' असे आव्हान दे़खील शेट्टी यांनी यावेळी दिले.
शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती
हिवरखेड येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याला प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, प्रविण मोहोड, दामोदर इंगोले यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अमरावती जिल्ह्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.