अमरावती -राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह इतर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूर पुण्यामध्ये अक्षरश: रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्याा. त्यानंतर आता अमरावतीतही इंजेक्शनसाठी सकाळपासूनच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकलसमोर मोठी रांग लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले. परंतु दुपारी बारा वाजेपर्यंतही रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी अमरावतीत रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा - Amravati corona update
अमरावतीतही इंजेक्शनसाठी सकाळपासूनच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकलसमोर मोठी रांग लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
अमरावती रेमडेसिवीर
आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण
नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तेथील रुग्णांना बेड, ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे तेथील रुग्णांना अमरावतीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती येथील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण वाढला आहे. यातच रुग्णांना लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामधील मेडिकलसमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या.