अमरावती -अंगात मुरलेला ताप, ( Fever in the body ) कोरडा खोकला,( Dry cough ) पोटात होणारी जळजळ, आम्लपित्त ( Bile acid ) अशा आजारांवर गुणकारी आयुर्वेदिक औषध ( Ayurvedic medicine ) असणाऱ्या पानपिंपरीचे उत्पादन ( Production of Panpimpri ) मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. एका विशिष्ट पद्धतीने पानपिंपरीची शेती केली जात असून वर्षभराच्या मेहनतीनंतर शेतकऱ्यांना पानपिंपरी प्राप्त होते.
अशी केली जाते पानपिंपरीची शेती -पानपिंपरीची शेती मुख्यतः बारी समाजातील शेतकरीच करतात. शेत जमीन ट्रॅक्टरने नांगरून जमिनीची मशागत केल्यावर मजुरांच्या माध्यमातून शेतात वाफे तयार केले जातात. यानंतर बिजारोपण करून संपूर्ण शेत जमिनीचे सिंचन केले जाते. हे पीक अतिशय नाजूक असून पानपिंपरीचा वेल वरती सरळ रेषेत वाढावा यासाठी हेट्याच्या फुलांची झाड शेतात लावली जातात. एका रेषेत उंच वाढणाऱ्या या झाडाच्या आधाराने पानपिंपरीची वेल देखील सरळ रेषेत उंच वाढत जाते. हेट्याच्या झाडांना पानपिंपरीची वेल बांधण्यासाठी मेळघाटातील जंगलातून तातू अर्थात एक प्रकारचे मजबूत गवत आणले जाते. या धातूच्या साह्याने ही वेल हेट्याच्या झाडाला बांधली जाते. पानपिंपरीच्या वेलीला उन्हाळ्यात भरपूर पाणी द्यावं लागतं. पावसाळ्यात पानपिंपरीसाठी अधिक पाणी हे धोकादायक ठरतं. मार्च एप्रिल महिन्यापासून पानपिंपरीच्या शेतीला सुरुवात होते. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पानपिंपरीच्या वेलाला शेंगांसारख्या भासणाऱ्या हिरव्या रंगाच्या पिंपरी लागतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये या पिंपरी काळसर वेलीवरच्या ह्या पिंपरी तोडून त्यांना सुकवले जाते. पानपिंपरी जितकी जास्त चांगली असेल तितका अधिक भाव तिला मिळतो. चारशे रुपयांपासून ते बाराशे रुपये पर्यंत पान पिंपरीला अनेक आयुर्वेदिक कंपन्यांकडून मागणी असते. अशी माहिती अंजनगाव सुर्जी येथील पानपिंपरी उत्पादक शेतकरी रमेश येऊल यांनी ' ईटीव्ही भारत ' शी बोलताना दिली.