अमरावती -गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसलेल्या आणि ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असेल, अशा कैद्यांना न्यायालच्या आदेशानुसार काही दिवसांसाठी तात्पुरत्या जामिनावर सोडले जात आहे. त्यामुळेच अमरावतीमधील मध्यवर्ती कारागृहातील ८० कैद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 45 ठिकाणी असलेल्या 60 कारागृहात जवळपास 38 हजार कैदी शिक्षा भोगत आहेत.
लॉकडाऊन : अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातील ८० कैद्यांची जामिनावर सुटका
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कारागृहात असलेली कैद्यांची संख्या लक्षात घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील विविध कारागृहात असलेल्या हजारो कैद्यांना काही दिवसांसाठी जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा...कोरोनाची धास्ती: एल्गार परिषदेच्या आरोपींची जामीनासाठी याचिका
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी कमी करणे, हा एक महत्त्वाचा उपाय आहे. राज्यातील सर्वच कारागृहे कैद्यांमुळे खचाखच भरलेली आहेत. त्यातच एखाद्या कैद्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची लागण इतरांना होऊ शकते. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यभरातील हजारो कैदी जे ७ वर्षांच्या आतील शिक्षेस पात्र आहे, अशा कैद्यांना जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अमरावतीतील मध्यवर्ती कारागृहातील जवळपास १२०० कैद्यांपैकी ८० कैद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी सोडण्यात आले.