अमरावती - शहरात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. शहरातील इतवारा बाजार दुपारी 12 नंतर बंद करण्यासाठी पोलिसांना काठ्या उगाराव्या लागल्या आहेत.
अमरावतीत इतवारा बाजार बंद करण्यासाठी पोलिसांनी उगारल्या काठ्या - अमरावती पोलीस
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे.़असे असताना अमरावती शहरात नागरिकांना भाजीपाला वगैरे अत्यावश्यक वस्तू घेता याव्यात यासाठी सकाळी 8 ते दुपारी 12पर्यंत संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतला.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे.़असे असताना अमरावती शहरात नागरिकांना भाजीपाला वगैरे अत्यावश्यक वस्तू घेता याव्यात यासाठी सकाळी 8 ते दुपारी 12पर्यंत संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतला. दरम्यान, इतवारा बाजार परिसरात दुपारी 12 वाजता सर्व दुकानं बंद करण्यासाठी पोलिसांनी 11.39 वाजतापासून सूचना देण्यास सुरुवात केली. 12 वाजल्याबरोबर पोलीस इतवारा बाजारात शिरले. यावेळी काही फळ विक्रेते, काही भाजी विक्रेते आणि काही किराणा दुकान चालकांनी आपली दुकानं सुरूच ठेवल्याचे दिसताच पोलिसांनी त्यांना लाठीचा प्रसाद देणे सुरू केले. पोलीस आक्रमक झालेले पाहून काही वेळातच बाजारातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून धूम ठोकली.