महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ambadas Danve Criticize To Rana Couple नाव राणा आणि काम रावणाचे, अंबादास दानवेंची राणा दाम्पत्यावर खोचक टीका - शिवसेना मेळावा लेटेस्ट न्यूज

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve Criticize To Navneet Rana And Ravi Rana यांनी नवनीत राणा आणि रवी राणांवर MP Navneet Rana And MLA Ravi Rana खोचक टीका केली. नाव राणा जरी असले, तरी त्यांचे काम रावणाचे असल्याचा हल्लाबोल अंबादास दानवेंनी अमरावतीत केला. त्यासह शिवसेना सोडून गेलेल्या गद्दार आमदारांपेक्षांही जास्त आमदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Ambadas Danve Criticize To Rana Couple
संपादित छायाचित्र

By

Published : Oct 12, 2022, 7:57 AM IST

अमरावती -आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा MP Navneet Rana And MLA Ravi Rana यांचे नाव जरी राणा असले, तरी ते काम रावणाचे करतात. त्यामुळे नाव राणा आणि काम रावणाचे करणाऱ्या राणा दाम्पत्याला आगामी निवडणुकीत अमरावतीतील शिवसैनिक हनुमान चालीसा म्हणायला घरी बसवतील, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve Criticize To Navneet Rana And Ravi Rana यांनी केली. ते मंगळवारी अमरावती येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात Shiv Sena Activist Rally In Amravati बोलत होते.

शिवसेनेची लाट क्रांती घडवणारयेणारा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena Chief Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची लाट येईल. शिवसेनेची मशाल Shiv Sena New Symbol ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रांती करेल, असा विश्वास दानवेंनी उपस्थित शिवसैनिकांना दिला. भारतीय जनता पार्टीची ढाल आणि गदारांची तलवार अशी प्रतिक्रिया दानवे Ambadas Danve Criticize To Bjp And Shinde Group यांनी शिंदे गटाला मिळालेल्या निवडणूक चिन्हावर दिली.

शिवसेना मेळाव्यात बोलताना अंबादास दानवे

कोरोनात दगावलेल्यांचा अंत्यविधी सन्मानानेकोरोना काळात सक्षम नेतृत्व असलेले मुख्यमंत्री Shiv Sena Chief Uddhav Thackeray महाराष्ट्राला मिळाले, त्यामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे अंत्यविधीही सन्मानाने पार पडले. मात्र उत्तर प्रदेश सारखे गंगेत मृतदेह टाकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

शिवसेना मेळाव्यात अंबादास दानवे

गेले, त्यापेक्षा दुप्पट निवडून येतील शिवसेनेतून जे ४० गद्दार गेले, त्यापेक्षा दुप्पट आमदार जिंकून आणण्याची ताकद शिवसेनेत Shiv Sena Will Win More MLA Said Ambadas Danve आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करा, अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. या मेळाव्यास जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, मनोज कडू, महानगर प्रमुख पराग गुडदे, जिल्हाप्रमुख सुनिल खराटे, महिला संघटीका वर्षा भोयर, ज्योती अवघडे, कविता देशमुख, महेंद्र दीपटे, राजेंद्र आकोटकर, अभिजीत भावे, गजानन काडोळे, गजानन चौधरी, गजानन विजयकर, गजानन पाटे, अंकुश दातीर, अंकुश गुजर, श्याम चांदूरकर, विनोद पायघन, शरद फिरके आदीसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details