अमरावती :जे नेत्रहीन आहे त्यांना दृष्टी मिळावी ( blind should get sight ) यासाठी अमरावतीचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील ( Amravati District General Hospital ) मित्र पिढी सातत्याने जनजागृती करते आहे. मोतीबिंदूमुळे ज्यांची दृष्टी जाण्याची शक्यता आहे त्यांची दृष्टी टिकावी यासाठी वर्षाला 4889 व्यक्तींवर शस्त्रक्रिया केली जाते.
दृष्टी टिकावी म्हणून नेत्रपेढीची 24 तास सेवा
महिनाभरात 468 शस्त्रक्रिया :अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रपेढीचे वर्षाला 4889 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे टार्गेट असून यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत 2477 व्यक्तींच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली आहे. या महिन्यात 468 शस्त्रक्रिया केल्या. महिन्याला सरासरी 500 शस्त्रक्रिया केल्या जातात अशी माहिती नेत्र तज्ञ डॉक्टर कृणाल वानखेडे यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली.
सहा महिन्यात काढले 26 आयबॉल :दोस्ती हिनांसाठी पूड अर्थात आयबॉल चे प्रत्यारोपण व्हावे यासाठी मृत्यूनंतर नेत्रदान करा असे आवाहन आमच्या वतीने सातत्याने करण्यात येते. यावर्षी आतापर्यंत दोन दृष्टी हिनांवर आयबॉल प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांना दृष्टी मिळाली. एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत एकूण 26 आयबॉल काढण्यात आले आहे. मृत्यूनंतर नेत्रदान करून दोन जणांना आपण दृष्टी देऊ शकतो. त्यामुळे नेत्रदान करा असा सल्ला आम्ही वारंवार देतो. कोणाचा मृत्यू झाल्यावर 24 तास खुले असणाऱ्या आमच्या नेत्र पिढीशी संपर्क साधतात आम्ही तात्काळ आयबॉल काढून घेऊ शकतो. नेत्रदानाबाबत समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. कृणाल वानखेडे म्हणाले.
स्क्रीन टाईम आटोक्यात आणा दृष्टी सांभाळा :आज अगदी लहान मुलं बराच वेळ मोबाईल फोन हाताळत आहेत. लहान मुलांसह वाढत्या वयातील मुलं आणि मोठे व्यक्ती देखील मोठा वेळ हे स्क्रीनवर देत आहेत. हा स्क्रीन टाईम आटोक्यात आणणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपला मुलगा स्क्रीनवर अधिक काळ राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. लहान मुलं हवे तसे पोषक आहार घेत नाहीत ही वास्तविकता आहे खरंतर हिरवा भाजीपाला, पिवळी फळ आणि मांसाहारी आहार देखील घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना मासोळी खायला देणे हे त्यांच्या डोळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याद्वारे त्यांना अ जीवनसत्व प्राप्त होते आणि अ जीवनसत्व डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे कुणाल वानखडे म्हणाले.