अमरावती -केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात रविवारी रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील अल्पसंख्यांक समुदायाप्रमाणेच सर्व सामाजाच्या नागिकांचा या रॅलीत समावेश होणार आहे. शहरातील काझीपुरा येथुन रविवारी दुपारी २ वाजता ही निषेध रॅली काढण्यात येणार आहे.
हेही वाचा... #Article 370: मोदी-शाहांनी दिली होती 'ऑफर'; झाकिर नाईकचा खळबळजनक दावा
चांदुर रेल्वे शहरात होणाऱ्या या रॅलीत, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयु) विद्यार्थी नेता उमर खालिद हा प्रामुख्याने सहभागी होणार आहे. त्यामुळे या रॅलीला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... एटीएममधून १०० रुपयाऐवजी निघाल्या ५०० रुपयांच्या नोटा, अन्...
रॅलीनंतर एनआरसी आणि सीएए विरोधात विविध पक्ष, संघटनांतर्फे सायंकाळी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सभा आयोजीत करण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजता आयोजित या लोकजागर सभेत उमर खालिद याचे भाषण होणार आहे. तसेच याठिकाणी कॅबिनेट मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड सुध्दा उपस्थित राहणार आहे. त्यामुळे हे दोघे नेते नेमके सभेत काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.