अमरावती - लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या नवनीत राणा यांनी यावर्षी प्रचार सुरू झाल्यापासून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. गेल्या १५ दिवसांत २ प्रचार सभांमध्ये २ वेळा नवनीत राणा यांनी खासदार अडसूळ यांच्यावर काही लोकांचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे अमरावती मतदारसंघात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
खासदार अडसूळ यांनी काही लोकांचा जीव घेतला - नवनीत राणा - लोकसभा
गेल्या १५ दिवसांत २ प्रचार सभांमध्ये २ वेळा नवनीत राणा यांनी खासदार अडसूळ यांच्यावर काही लोकांचा जीव घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
प्रचार सभेत बोलताना नवनीत राणा यांनी खासदार अडसूळ यांच्यावर हे आरोप केले. खासदारांना माझे आव्हान आहे, की त्यांनी एका तालुक्यातील २० शिवसेना कार्यकर्त्यांचे नावे तोंडी सांगितली तर मी त्यांना मान्य करेन. त्यांनी फक्त अडसूळसेना बनवली आहे. शिवसेनेची ओरिजनल ही बाळासाहेबांची सेना होती. या माणसांनी ती संपवून टाकली आहे आणि स्वतःची सेना निर्माण केली आहे.
शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते होते. त्यांना घरी बसवले, काही लोकांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले, तर काही लोकांचे जीव या खासदाराने घेतले आहेत, असा गंभीर आरोप अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केला आहे.