महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati Shivaji Maharaj Statue Removed : बाळासाहेबांचा आदर्श कुठे हरवला? खासदार नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल - नवनीत राणा उद्धव ठाकरे टीका

राजापेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Shivaji Maharaj Statue Remove In Amravati ) हटवल्यानंतर अमरावतीत तणावाची स्थिती आहे. यासंदर्भात खासदार नवनीत राणा ( Navneet Rana On Shivaji Maharaj Statue ) यांनी रोष व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Navneet Rana Alligation On CM Uddhav Thackeray ) हे स्वतः देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Amravati Shivaji Maharaj Statue Removed
Amravati Shivaji Maharaj Statue Removed

By

Published : Jan 16, 2022, 5:03 PM IST

अमरावती -राजापेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Shivaji Maharaj Statue Remove In Amravati ) हटवल्यानंतर अमरावतीत तणावाची स्थिती आहे. यासंदर्भात खासदार नवनीत राणा ( Navneet Rana On Shivaji Maharaj Statue ) यांनी रोष व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजत्यांचा पुतळा बसवण्याला विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Navneet Rana Alligation On CM Uddhav Thackeray ) हे स्वतः देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता उपभोगणारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श विसरले असल्याची टीका खासदार राणा यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना अटक -

अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता 12 जानेवारीरोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. हा पुतळा आज पहाटे महापालिका प्रशासनाने काढून टाकल्यामुळे युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्या शंकर नगर येथील घरासमोर तगडा पोलीस बंदोबस्त लावला. तसेच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना स्थानबद्ध केले. दुपारी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा व खासदार नवनीत राणा यांनी राज्य शासनाचा मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदविला. यावेळी प्रचंड गोंधळ सुरू असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.

राणांच्या घरासमोर तणाव कायम -

आमदार रवी राणा यांनी दुपारी तीन वाजता घरी पत्रकार परिषद बोलावली होती. दरम्यान, पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले असल्याने आमदार रवी राणा यांना पत्रकारांशी संवाद साधण्यासही पोलिसांनी नकार दिला. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असताना त्यांच्या घरासमोर अद्यापही कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस लक्ष देऊन आहेत.

Statue of Shivaji Maharaj Removed : अमरावतीत पुतळ्यांचे राजकारण; शहरासह दर्यापूरमध्ये तणाव

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details