अमरावतीअमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी आज आपल्या घरावर तिरंगा फडकावला. तसेच हर घर तिरंगा अभियान Har Ghar Tiranga Campaign संपूर्ण अमरावती जिल्ह्यात यशस्वी करावे असे आवाहन अमरावतीकरांना केले.
राष्ट्रीय प्रतीकांचे केले वाटपखासदार नवनीत राणा यांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकावला. त्यानंतर शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांना राष्ट्रीय प्रतीक असणारे अनेक बॅचेस बिल्ले आधी साहित्यांचे वाटप केले. हातात तिरंगा झेंडा घेऊन खासदार नवनीत राणा यांनी देशभक्तीचा जोश उपस्थितांमध्ये निर्माण केला. भारत माता की जय वंदे मातरम असा जयघोष देखील खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला.