अमरावती - राजकीय वजन वाढवण्यासाठी जास्त तसेच मंत्रिपदासाठी खासदार नवनीत राणांनी दहीहंडीचे dahi handi आणि रक्ततुलेचे आयोजन केले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केला होता. त्यांच्या या आरोपाला आता नवनीत राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकांची सेवा करुन खऱ्या अर्थाने राजकीय वजन वाढवता येते. दहीहंडी तर हा सामाजिक उपक्रम आहे. तो आम्ही दरवर्षी साजरा करतो, असे नवनीत राणांनी स्पष्ट केलं mp navneet rana attacks mla amol mitkari आहे.
मिटकरींना सल्ला -अमोल मिटकरी यांना माझ्या जिल्ह्या विषयी काहीही माहिती नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार Opposition Leader Ajit Pawar सुद्ध जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, ते काहीच बोलत नाही. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला नवनीत राणांनी दिला आहे.