अमरावती : गेल्या काही काळापासून लव्ह जिहादची प्रकरणे वाढत असल्याचे ( Love Jihad Cases have been Increasing ) दिसत असून, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना पाहायला मिळत ( Love Jihad Cases in Maharashtra ) आहे. यासंदर्भात देशातील काही राज्य सरकारांनी आपापल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. मात्र, लव्ह जिहादप्रकरणी देशात लागू होणारा कायदा करायला हवा, यासाठी संसदेत विधेयक मांडणार असल्याची माहिती भाजप नेते आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ( MP Dr Anil Bonde Statement on Love Jihad ) दिली.
Anil Bonde on Love Jihad : लव जिहादप्रकरणी संसदेत विधेयक आणणार - खा. अनिल बोंडे - खासदार अनिल बोंडेंची दिल्लीत माहिती
गेल्या काही काळापासून लव्ह जिहादची प्रकरणे महाराष्ट्रात वाढत असल्याचे ( Love Jihad Cases have been Increasing ) दिसत आहे. ( Love Jihad Cases in Maharashtra ) यासंदर्भात देशातील काही राज्य सरकारांनी आपापल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. मात्र, लव्ह जिहादप्रकरणी देशात लागू होणारा कायदा करायला हवा, यासाठी संसदेत विधेयक मांडणार असल्याची माहिती भाजप नेते आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ( MP Dr Anil Bonde Statement on Love Jihad ) दिली.
संसदेत आणणार विधेयक :दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये बोलताना अनिल बोंडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, राज्यात सध्या 'लव जिहाद'ची प्रकरणे मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून, यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार आहे. तसेच, आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची असल्याचेही ते म्हणाले.
एक सुनियोजित कटकारस्थान :'लव्ह जिहाद' हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याकांडनंतर ज्या आरोपीला पडकण्यात आले, त्याचाही लव्ह जिहाद प्रकरणात हात होता, हे सिद्ध झाले. मेळघाटातील आदिवासी मुलींना फसवून पळवून आणले जाते. मुलींनी विरोध केला तर मुलींना जीवही गमवावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना चिखलदरा तालुक्यातून समोर आली आहे. ही मुले महाविद्यालयासमोर उभे राहून मुलींवर लक्ष ठेवतात. फेसबुकच्या माध्यामातून मुलींशी संपर्क केला जातो. हे सर्व सुनियोजितपणे सुरू असते, असे खा. अनिल बोंडे यांनी सांगितले.