महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पशुधनाची निगा राखण्यासाठी अमरावती जिल्ह्यात अद्ययावत फिरता वैद्यकीय दवाखाना - Amravati livestock marathi news

पशुधनाची निगा राखणे व विविध पशुआजारांच्या साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले.

यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर

By

Published : Mar 12, 2021, 3:18 PM IST

अमरावती -मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेत सुरू झालेल्या या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध आहे. पशुधनाची निगा राखणे व विविध पशुआजारांच्या साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले.

पशु आजारांवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेत सुरू झालेल्या या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध आहे. पशुधनाची निगा राखणे व विविध पशुआजारांच्या साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

यांची होती उपस्थिती

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज फिरत्या दवाखान्याचा शुभारंभ झाला. आमदार बळवंतराव वानखेडे, महापौर चेतन गावंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सदस्य शरद मोहोड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे आदी उपस्थित होते.

सोमवारपासून टोल फ्री क्रमांक

फिरत्या दवाखान्याच्या सेवेसाठी शेतकरी बांधवांना संपर्क साधता यावा म्हणून पशुसंवर्धन कार्यालयाकडून स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला असून, 1962 हा टोल फ्री क्रमांक येत्या सोमवारपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमातून सेवेबाबत मागणी प्राप्त होताच कक्षातून थेट फिरत्या दवाखान्याला संदेश प्राप्त होईल व पुढील कार्यवाहीसाठी व्हॅन तत्काळ रवाना होईल, अशी माहिती डॉ. गोहोत्रे व डॉ. रहाटे यांनी दिली. या टप्प्यात तिवसा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी व अमरावती तालुक्यात ही व्हॅन फिरेल, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज फिरत्या दवाखान्याचा शुभारंभ झाला. आमदार बळवंतराव वानखेडे, महापौर चेतन गावंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सदस्य शरद मोहोड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details