महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनातून राज्याच्या कल्याणकारी योजनांची माहिती; संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजन - राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन

राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती नागरिकांना व्हावी, या दृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्य संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांच्या हस्ते करण्यात आले. चित्र प्रदर्शनाचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी केले.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : May 1, 2022, 3:30 PM IST

अमरावती -राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती नागरिकांना व्हावी, या दृष्टीने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्य संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांच्या हस्ते करण्यात आले. चित्र प्रदर्शनाचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी केले.

यावेळी आमदार सुलभा खोडके, माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विभागीय माहिती कार्यालयाचे प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार, श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली ठाकरे, हरीभाऊ मोहोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण योजनाचीही प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना - समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनामार्फत सर्वंकष प्रयत्न होत आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत महाराष्ट्रदिनी एकाचवेळी राज्यभर सर्व विभागीय ठिकाणी सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम नागरिकांना योजना व विकास कामांची माहिती मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हास्तरावरील नाविण्यपूर्ण योजना, उपक्रम व संबंधित यंत्रणा आदी माहितीबाबतही याचप्रकारे सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. हे प्रदर्शन 5 मेपर्यंत कसाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत सर्वांसाठी खुले आहे.

हेही वाचा -नाशिकात रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलामुलींची बालगृहात रवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details