Melghat Water Crisis : अमरावती - मेळघाटातील खडियाल गावातील लोक एक बादली पाण्यासाठी जीव धोक्यात घालत ( bucket of water ) आहेत. "गावात फक्त दोनच विहिरी आहेत. ज्या जवळपास कोरड्या पडल्या आहेत, 1500 लोकसंख्येचे गाव दररोज पाण्यासाठी 2-3 टँकरवर अवलंबून आहे", अशी भीषण परीस्थिती असताना नेते, प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अक्षम ठरले आहे, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे. कोरड्या विहिरीत पाणी टाकून दोन टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जातो. विहिरीतून पाणी काढण्यासाठी लोक जीव धोक्यात घालतात. घाणेरडे पाणी प्यायल्याने आजार वाढत आहेत. एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही. ," असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
विहिरीतल्या डबक्यातुन पिणासाठी पाणी :अनेक दिवसांपासून गावात मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई आहे. गावात प्रशासनाच्या वतीने दिवसाला दोन ते तीन टँकर दिले जातात. ते पाणी विहिरीत टाकले जाते. विहिरीत असलेल्या डबक्यातून मिळेल ते पाणी घरगुती वापरासाठी व पिण्यासाठी वापरले जाते. यातून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई परसत आहे. मात्र त्यांना लोकांना रुग्णालयात नेण्यासाठीही रस्ता नाही अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.