महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amravati ZP school उपक्रमशील शिक्षकामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचं रूपडं पालटलं, शिक्षणाच्या दर्जातही सुधारणा - आदर्श शिक्षक

2018 मध्ये सतीश धाडसे (satish dhadase ideal teacher) हे जिल्हा परिषदेचे शिक्षक (savangi sangam zp school) सावंगी संगम येथील शाळेत रूजू झाले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या प्रवाहात आणण्याकरिता त्यांनी विशेष प्रसत्न केले. कोरोना काळात शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा सतिश धाडसे यांनी उपक्रम राबविला. दरम्यान, धाडसे यांचा प्रशासनाकडून विशेष सन्मान देखील करण्यात आला. पाहूयात या अवलिया शिक्षकाची कहाणी...

Amravati ZP school
उपक्रमशील शिक्षकामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचं रूपडं पालटलं, शिक्षणाच्या दर्जातही सुधारणा

By

Published : Sep 15, 2022, 5:42 PM IST

Updated : Sep 15, 2022, 7:07 PM IST

अमरावती2002-03 या सालात सतीश धाडसे (satish dhadase ideal teacher) हे शिक्षक म्हणून अमरावती जिल्हा परिषदेत रुजू झाले. सुरुवातीची पाच ते सहा वर्ष मेळघाटात शिक्षक म्हणून सेवा दिल्यावर 2008 मध्ये सतीश धाडसे हे चांदुर रेल्वे तालुक्यातील कोहळा खानापूर या शाळेत रुजू झाले. 2018 मध्ये सतीश धाडसे हे जिल्हा परिषदेचे शिक्षक सावंगी संगम (savangi sangam zp school) येथील शाळेत रूजू झाले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या प्रवाहात आणण्याकरिता त्यांनी विशेष प्रसत्न केले. कोरोना काळात शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा सतिश धाडसे यांनी उपक्रम राबविला. दरम्यान, धाडसे यांचा प्रशासनाकडून विशेष सन्मान देखील करण्यात आला. पाहूयात या अवलिया शिक्षकाची कहाणी...

उपक्रमशील शिक्षकामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचं रूपडं पालटलं, शिक्षणाच्या दर्जातही सुधारणा

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड(Interest in learning among students)गावातील चिमुकल्यांमध्ये अचानक शाळेप्रती आवड निर्माण झाली. इयत्ता दुसरी तिसरीत गेल्यावरही साधी अक्षर ओळख नसणारे आपले पाल्य अभ्यासात अचानक हुशार झाले. ही काही जादू नव्हती, तर शाळेत केवळ नवीन शिक्षक आले आणि शाळेचे रूप तर पालटलेच. मात्र, गावातील वातावरण देखील शैक्षणिक झाले. अमरावतीजिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात सावंगी संगम ह्या गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे पार रूपचं बदलले. चार वर्षांपूर्वी शाळेत रुजू झालेल्या सतीश धाडसे या शिक्षकामुळे शाळेसह गावातील वातावरणचं पार बदलले.

2018 पासून शाळेचं रुपडं पालटलंशाळेच्या परिसरात असलेल्या खताच्या जागेवर मुख्याध्यापकांच्या मदतीने सतीश धाडसे यांनी सुंदर वर्गखोलीची निर्मिती केली. दहा वर्षात कोहळा खानापूर येथील शाळेचा कायापालट केल्यावर 2018 मध्ये सतीश धाडसे यांचे सावंगी संगम येथील शाळेत स्थानांतर झाले. या नव्या शाळेत रुजू होताच त्यांनी स्वतः पाचशेच्या वर कृतीपत्रिका तयार करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या प्रवाहात आणण्याकरिता तयारी करून घेतली. सावंगी संगम येथील शाळेत पहिल्यांदाच प्रवेशोत्सव, मेहंदी स्पर्धा, ग्राम स्वच्छता अभियान, महिला मेळावे, बैलपोळा, दप्तर मुक्त शाळा अशी अभियानं राबविली.

कोरोना काळात निरंतर शिक्षण कोरोना काळात शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी (education to door) हा उपक्रम राबविला. सुंदर शुद्धलेखन, शब्दपट्ट्या, बालसंसद असे नानाविध उपक्रम शाळेत राबवून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये शिक्षणाच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीद्वारे शिक्षणाप्रती आवड निर्माण केली. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कळावी यासाठी थेट निवडणूक आयोगाप्रमाणे निवडणूक घेऊन बालसंसद हा उपक्रम राबवून मुलांचे मंत्रिमंडळ स्थापन केले. आज या शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या सर्व कामांबाबत संपूर्ण माहिती आहे.

प्रशासनाने केला सन्मानआपल्या शाळेत येणारा आपला विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी व्हावा यासाठी सतीश धाडसे यांनी विद्यार्थ्यांना कळेल... झेपेल अशा पद्धतीने सर्वच विषयांचे धडे देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी देखील सतीश धाडसे यांच्या नव्या उपक्रमांना प्रतिसाद देत शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने गुणवत्ता प्राप्त करण्याचा केलेला प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी झाला. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता भौतिक परिसर आणि समाजाचा सहभाग सतीश धाडसे यांना (Honor quality) सन्मान गुणवत्तेचा, सन्मान पेरणीचा ह्या उपक्रमांतर्गत तालुका व जिल्हा स्तरावर प्रशासनाच्या वतीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक बहाल करून त्यांचा सन्मान केला.

Last Updated : Sep 15, 2022, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details