अमरावती -शहरात हिंसाचार घडविण्याच्या प्रकरणात आरोपी असणारे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांनी आज शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. शनिवारी भाजपच्या बंद दरम्यान शहरात तणाव निर्माण होऊन हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. पोलिसानी भाजपच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड केली होती.
माजी मंत्री जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण - अमरावती हिंसाचार
शहरात हिंसाचार घडविण्याच्या प्रकरणात आरोपी असणारे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांनी आज शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. शनिवारी भाजपच्या बंद दरम्यान शहरात तणाव निर्माण होऊन हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. पोलिसानी भाजपच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड केली होती.
पोलीस गुप्ता, पोटे यांना न्यायालयात करणार हजर
पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणारे जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांना शहर कोतवाली पोलिस आज दुपारी न्यायालयासमोर हजर करणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल बोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, नगरसेवक तुषार भारतीय यांच्यासह 14 जणांना दोन दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. जगदीश गुप्ता आणि प्रवीण पोटे यांनासुद्धा न्यायालय आज जामिनावर मुक्त करेल असा विश्वास एडवोकेट प्रशांत देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -VIDEO : राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार चार दिवस देवेंद्र फडणवीसांच्या होमपीचवर