अमरावती -दारू पिण्या करता पैसे न दिल्यामुळे दारुड्या पतीनेच आपल्या पत्नीची काठीने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जील्ह्यातील पंढरी या गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
धक्कादायक: दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीची हत्या - हत्या
दारूचे व्यसन असलेला प्रकाश दारू पिण्यासाठी बाहेर जात निघाला होता. खिश्यात पैसे नसल्यामुळे पत्नीकडे त्याने पैशाची मागणी केली . मात्र, पतीला नेहमीची सवय असल्याने पत्नीने दारूसाठी पैसे न देण्याचा चंग बांधला होता. याच वादातून दारूसाठी पैसे न दिल्यामुळे आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश पांडुरंग उईके (रा .पंढरी) असे पत्नीची हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत अनिता प्रकाश उईके पत्नीचे नाव आहे. हे दोघेही आपल्या मुलाबाळांसह पंढरी गावात राहण्यासाठी काही महिन्यापूर्वी आले होते. दारूचे व्यसन असलेल्या प्रकाश दारू पिण्यासाठी बाहेर जात निघाला होता. खिश्यात पैसे नसल्यामुळे पत्नीकडे त्याने पैशाची मागणी केली . मात्र, पतीला नेहमीची सवय असल्याने पत्नीने दारूसाठी पैसे न देण्याचा चंग बांधला होता. याच वादातून दारूसाठी पैसे न दिल्यामुळे आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.