महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sane Guruji Manav Seva Sangh : हृदयरुग्णांची सेवा हेच गुरुवंदन, संत अच्युत महाराज भक्त परिवाराचा अनोखा उपक्रम

संत अच्युत महाराज ( Saint Achyut Maharaj ) यांनी अमरावती शहरात साने गुरुजी मानव सेवा संघ ( Sane Guruji Manav Seva Sangh ) अंतर्गत हॉट हॉस्पिटल उभारले. हृदय रुग्णालयच्या माध्यमातून हृदय रुग्णांची सेवा हेच गुरुवंदन अशा स्वरूपाची भावना अमरावतीकरांनी व्यक्त त्यांनी केली आहे.

Sane Guruji Manav Seva Sangh
साने गुरुजी मानव सेवा संघ

By

Published : Jul 15, 2022, 8:03 PM IST

अमरावती -ज्ञानोपासनेद्वारा अध्यात्म मार्गावर वाटचाल करणारे संत अच्युत महाराज यांनी समाज क्रांतीचा इतिहास घडविणाऱ्या संतान प्रमाणेच समाजासमोर वास्तव स्थितीचे अवलोकन करून भक्तीच्या माध्यमातून जीवनात उपयुक्त तत्त्वज्ञान मांडले आहे. अमरावती शहरात साने गुरुजी मानव सेवा संघ ( Sane Guruji Manav Seva Sangh ) अंतर्गत हॉट हॉस्पिटल उभारले. अच्युत महाराजांचा प्रचंड मोठा अनुयायी ( followers of Achyut Maharaj ) वर्ग विदर्भात आहे. आज हृदय रुग्णालयच्या ( Heart Hospital ) माध्यमातून हृदय रुग्णांची सेवा हेच गुरुवंदन अशा स्वरूपाची भावना अमरावतीकरांनी व्यक्त केली आहे.

संत अच्युत महाराज
गुरुपूजनाला उचलली गर्दी -श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळाच्या वतीने अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे गुरु पौर्णिमेनिमित्त गुरु पूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. श्री संत अच्युत महाराज संस्थांचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर यांच्या अध्यक्ष ते आयोजित या सोहळ्याला हरिभक्त पारायण सचिन देव महाराज यांनी गुरुपौर्णिमा या विषयावर प्रवचन केले. या सोहळ्यात संत अच्युत महाराज यांच्या त्यांच्या प्रतिमेसह पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली.

हेही वाचा -Devendra Fadnavis meets Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट; शर्मिला ठाकरेंकडून औक्षण

हार्ट हॉस्पिटल इमारत विस्तारीकरणाच्या शुभारंभ -अमरावती शहरातील मराठी मार्गावर संत अच्युत महाराज यांनी स्वतः एक ऑक्टोबर 1998 ला विजयादशमीच्या मुहूर्तावर हार्ट हॉस्पिटल उभारले. 27 हजार फूट स्क्वेअर जागेत उभारण्यात आलेल्या ह्या रुग्णालयाची विस्तारीकरण आता 70 हजार स्क्वेअर फुट जागेवर होत आहे. अमरावती शहरात सर्वात मोठी ही नऊ मजली इमारत असणार असून यासाठी केवळ इमारत बांधकामासाठी साडेबारा हजार कोटी रुपये लागणार आहे तर रुग्णालयातील इतर साहित्यांसाठी अतिरिक्त 12 कोटी रुपये लागणार असल्याची माहिती अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे विश्वस्त सुधीर दिवे 'ई टीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

हृदयविकारावर मोफत इलाज -अमरावती शहरातील संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या रुग्णांवर मोफत इलाज केला जातो. 99% रुग्ण हे दारिद्र्यरेषेखालचे असून कोणाकडूनही हृदयविकाराशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी कुठलेही रक्कम घेतली जात नाही अशी माहिती देखील सुधीर दिवे यांनी दिली.



हेही वाचा -Delhi Warehouse Collapsed : दिल्लीत बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली.. ६ कामगारांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details