महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वंचितचा 'महाराष्ट्र बंद'; अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - वंचित बहुजन आघाडी अमरावती

देशात ढासळत्या अर्थव्यवस्थेच्याविरोधात सरकारला जाब विचारण्यासह नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. सरकारने देशातील महत्वाच्या कंपन्या विकायला काढल्या असल्याचा विरोधही वंचितने केला आहे.

vanchit bahujan aghadi protest
वंचितचा 'महाराष्ट्र बंद'; अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By

Published : Jan 24, 2020, 12:38 PM IST

Updated : Jan 24, 2020, 12:48 PM IST

अमरावती- वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'च्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळपासून बाजारपेठ उघडायला लागली आहे. यासोबतच सकाळच्या सत्रातील शाळाही नेहमीप्रमाणे सुरू झाल्या आहेत. दुपारी मात्र बंद समर्थक रस्त्यावर उतरण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रत्येक हालचालींकडे करडी नजर ठेवून आहेत.

वंचितचा 'महाराष्ट्र बंद'; अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

देशात ढासळत्या अर्थव्यवस्थेच्याविरोधात सरकारला जाब विचारण्यासह नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. सरकारने देशातील महत्वाच्या कंपन्या विकायला काढल्या असल्याचा विरोधही वंचितने केला आहे.

बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमरावती शहरातील महत्वाच्या अशा राजकमल चौक, चित्रा चौक, इतवारा बाजार, रेल्वे स्टेशन चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इर्विन चौक येथे एकत्रित येत आहेत. दुपारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहर बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jan 24, 2020, 12:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details