अमरावती -विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरला ओळखले जाते. प्रतिपंढरपूर म्हणून रुख्मिणीचे माहेर कौंडण्यपूर असे म्हटले जाते. आषाढी एकादशीला दरवर्षी रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात. १५९४ वर्षांपासून ही चालत आलेली सर्वात जुनी परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द झाली असली तरी पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिली आहे. दहा पालख्यांतील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरची पालखी. एसटीबसने 40 वारकऱ्यांसह ही पालखी प्रस्थान झाली आहे.
विदर्भातील कौंडण्यपुरातील रुक्मिणी मातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान कोरोनाच्या सावटात पालखी वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ
यावर्षी ही पालखी ४२८ व्या वर्षात प्रदार्पण करीत आहे. कोरोनाच्या सावटामध्ये ही पालखी वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. दरवर्षी पायी जाणारी महाराष्ट्रातील सर्वात जुन्या पालखीला यावर्षी मात्र एसटी महामंडळाच्या बसणे माता रुक्मिणीच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाल्या. आज सकाळी जिल्ह्याच्या पालकमंत्री व राज्याच्या बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंदिरात पादुकांचे पूजन करून माता रुक्मिणीची ओटीसह विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून गावातून पालखी काढण्यात आली. तर यावर्षी शेतकरी समृद्धी होवो कोरोनाचा सावट दूर झाले पाहिजे, असे साकडेदेखील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घातले आहे.
हेही वाचा -कौंडण्यपुरात रुक्मिणी मातेच्या पादुकांचे यशोमती ठाकूरांच्या हस्ते पूजन, पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
रुक्मिणी मातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान टाळ मृदुंगाच्या गजरात वारकर्यांनी पालखीला निरोप
अंबिका देवीच्या मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते. अशी आख्यायिका असलेल्या अंबिका मातेच्या मंदिराजवळ पालखीचा पहिला विसावा झाला. त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या समवेत पहिले रिंगण सुद्धा झाले. यावेळी राज्याच्या बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी रिंगण सोहळ्यात फुगडी खेळून वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यानंतर रुक्मिणी मातेच्या पादुकांसह माता अंबिका देवीचे सुद्धा पादुका घेऊन गावाच्या वेशीवर टाळ मृदुंगाच्या गजरात वारकर्यांनी व गावातील लोकांनी पालखीला निरोप दिला. त्यानंतर मात्र शासनाच्या राज्य परिवहन मंडळाच्या लालपरीने माता रुक्मिणीची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली. यावेळी तालुक्याचे प्रशासकीय यंत्रणा डॉक्टर्स यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सुद्धा निर्देश संस्थांना दिले. पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची प्रशासनाकडून याची तपासणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पालखी सोहळ्यात जाण्याची परवानगी दिली. सोबतच पोलीस यंत्रणा व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांसोबत ही पालखी पंढरपूरला मार्गस्थ झाली. रुख्मिणीच्या माहेर वरून येणाऱ्या पालखीला पंढरपूर येथे महत्वाचे स्थान आहे. याठिकाणी माहेरवरून साडीचोळी रुख्मिणीला चढविण्याचा मान असतो.
'पौर्णिमेपर्यंत पालखी थांबू द्यावी'
पायी वारी करिता आग्रह होतो, पण बसने जावे लागते आहे हे दुर्दैव आहे. वारकऱ्यांचा जीव पंढरी करिता तळमळतो आहे, मंदिर उघडे करण्यात यावे, पौर्णिमेपर्यंत पालखी थांबू द्यावी, अशी मागणी विश्व वारकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केली.
हेही वाचा -अमोल कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलावे - शिवाजीराव आढळराव पाटील