अमरावती -कोरोना आणि डेल्टा प्लसला रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशानुसार शहरातील बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यावर मात्र अमरावतीकरांची गर्दी कायम आहे.
अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू
जिल्हा प्रशासनाने औषधी, फळ, भाज्या, बेकरी तसेच हॉटेल व्यवसायास विकेंडमध्येही सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याने ही सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असल्याने बंदचा विशेष असा परिणाम दिसत नाही. शहरातील जयस्तंभ चौक ते सरोज चौक तसेच नमुना परिसरातील कापड मार्केट बंद आहे. या भागात कपड्यांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद आहेत. बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यांवर नागरिकांची गर्दी मात्र आहे.
इतवारा बाजार सुरू