अमरावती अमरावती जिल्ह्यात सात ग्रामपंचायतींची थेट सरपंचपदाची निवडणूक पार पडली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये २९ व ३० सप्टेंबर रोजी उपसरपंच पदाची निवड करण्यात येणार आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. यासाठी तालुका निवडणूक अधिकाऱ्यांद्वारा अधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
29 आणि 30 सप्टेंबरला अमरावती जिल्ह्यात ७ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदांची निवडणूक - gram panchayat Election
अमरावती जिल्ह्यात सात ग्रामपंचायतींची थेट सरपंचपदाची निवडणूक पार पडली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये २९ व ३० सप्टेंबर रोजी उपसरपंच पदाची निवड करण्यात येणार आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे.
जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार रोहणखेडा, चांदूरवाडी, हरिसाल, आखतवाडा, कवाडगव्हाण ग्रामपंचायतींमध्ये २९ सप्टेंबरला व घोटा व उंबरखेड येथे ३० ला उपसरपंच निवडीकरिता पहिली सभा होणार आहे. हरिसाल येथे विजय दारसिंबे (सरपंच), कवाडगव्हाणला मोहिनी चौधरी (सरपंच), उंबरखेडला नितीन कळंबे (सरपंच), घोटा येथे रुपाली राऊत (सरपंच), रोहणखेडला सुनील उगले (मंडळ अधिकारी, शिराळा) व आखतवाडा येथे नंदकिशोर मधापुरे (मंडळ अधिकारी, कुऱ्हा), चांदूरवाडी येथे नायब तहसीलदार एल. एस. तिवारी हे अधिकारी राहणार आहे. सकाळी १० ते १२ दरम्यान उमेदवारी अर्जाची छाणनी होईल.
जिल्ह्यात एकूण पाच ग्रामपंचायतींसाठी १७ सप्टेंबर ला मतदान झाले होते. निवडणुकीचा निकाल १९ सप्टेंबर ला जाहीर झाला होता. यामध्ये तिवसा तालुक्यातील घोटा, कवडगव्हाण आणि उंबरखेड या तिन्ही ग्रामपंचातीत काँग्रेसने बाजी मारली होती. तर चांदूर तालुक्यात चांदूरवाडी येथे भाजपने बाजी मारली होती . धारणी तालुक्यात हरिसाल येथे युवकांनी ग्रामपंचायत जिंकली असून, अमरावती तालुक्यात रोहणखेडा आणि आखतखेडा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे.