अमरावती -देशात वाढलेली महागाई तसेच ईडीच्या माध्यमातून दबावतंत्राविरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. अमरावतीतही शहर काँग्रेसच्या वतीन राजकमल चौक येथे केंद्र शासनाविरुद्ध निदर्शने करण्यात आली. भाजपचे अखेरचे काही दिवस सत्तेत शिल्लक राहिले असून, लवकरच देशात सत्ता परिवर्तन होईल, अशी आशा काँग्रेसने व्यक्त केली ( Congress Protest In Amravati ) आहे.
पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी -शहर काँग्रेसच्या वतीने राजकमल चौक येथे केंद्र शासनाविरोधात आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. देशभर महागाई वाढली असून, केवळ विशिष्ट उद्योगपतींनाच लाभ मिळत आहे. देशातील जनता त्रस्त झाल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. आता भाजपचे अखेरचे काही दिवस सत्तेत शिल्लक राहिले असून, लवकरच देशात सत्ता परिवर्तन होईल, अशी आशा यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.