महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूरांचे बच्चे कंपनी सोबत नृत्य - school Program

यशोमती ठाकूर यांनी एका शालेय कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत सामूहिक नृत्य केले.

यशोमती ठाकूर

By

Published : Jul 27, 2019, 11:37 PM IST

अमरावती - तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी एका कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसोबत सामूहिक नृत्य केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.

तिवसा येथे यशोमती ठाकूर मित्र मंडळ, शिक्षण विभाग व नगर पंचायत यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी "मस्ती की पाठशाळा" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ठाकूर यांनी कार्यक्रम संपल्यानंतर शालेय मुलींसोबत सामूहिक नृत्य केले.

अमरावतीमधील एका शालेय कार्यक्रमात यशोमती ठाकूर विद्यार्थ्यांसोबत सामूहिक नृत्य करताना

लोकप्रतिनिधी नेहमी धकाधकीत जगतात. मात्र, ठाकूर यांनी आज मनसोक्त आनंद घेत कार्यक्रमात विद्यार्थिनींसोबत नृत्य केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details