अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उपकुलसचिव सुलभा पाटील यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये नागपूर ते मुंबई असा तीन वेळा विमानाने प्रवास केल्याचे दाखवून यासाठी विद्यापीठाची 39 हजार 71 रुपयांनी फसवणूक केल्याचे विद्यापीठाच्या मागील सिनेटच्या बैठकीत समोर आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल सिनेटच्या पुढल्या बैठकीत ठेवण्यात येईल, असा शब्द कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी दिला होता. मात्र, शुक्रवारच्या बैठकीत या गंभीर प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास कुलगुरू अपयशी ठरल्याने कुलगुरुंविरोधात रोश उफाळून आल्याने सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला.
शब्द देवूनही कुलगुरुंनी पाळला नाही शब्द; अपहाराचा अहवाल अजूनही सादर नाहीच
नागपूर ते मुंबई असा तीन वेळा विमानाने प्रवास केल्याचे दाखवून यासाठी विद्यापीठाची 39 हजार 71 रुपयांनी फसवणूक केल्याचे विद्यापीठाच्या मागील सिनेटच्या बैठकीत समोर आले आहे.
कुलगुरु जे शब्द देतात त्या शब्दाचे पालन सभागृहात होत नाही ही खेदजनक बाब असल्याचे प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी म्हणाले. चौकशी अशी तडकाफडकी होत नाही चौकशी करताना अनेक गोष्टी समोर येत असल्यामुळे चौकशीचा कालावधी हा वाढतो, असे स्पष्टीकरण कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी दिले असता कुलगुरू म्हणून आपण स्वतः मागील सभेत जो शब्द दिला तो शब्द या सभेत पाळायला हवा होता. नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणाची चौकशी होईल असे सांगण्यात आल्यावर जी काही चौकशी समिती गठित करण्यात आली. या चौकशी समितीची पहिली बैठक 6 फेब्रुवारीला होते हे पटणारे नाही. इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणात कुलगुरू गंभीर नसल्याचा आरोपही यावेळी प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी प्राध्यापक डॉक्टर विवेक देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान, कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी पुढच्या सभेत चौकशी अहवाल सादर करण्यात येईल येईल असे स्पष्ट केले. पुढची सभा आता आठ महिन्यांनी होणार तोपर्यंत गुन्हेगाराची पाठराखण केली जाणार आहे त्यामुळे केवळ एक महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करावा अशी मागणी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण रघुवंशी यांनी केली. कुलगुरूंनी मात्र पुढच्या बैठकीत निश्चितपणे चौकशी अहवाल सादर होईल असे सभागृह समोर स्पष्ट केले.
काय आहे नेमके प्रकरण -
विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विभागाच्या उपकुलसचिव सुलभा पाटील यांनी मंत्रालयात विद्यापीठाच्या कामानिमित्त नागपूर ते मुंबई असा तीन वेळा विमान प्रवास केला. हा प्रवास 2 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2017 या कालावधीत झाला होता. पाटील यांनी विद्यापीठाच्या कामासाठी नव्हे तर वैयक्तिक कामासाठी प्रवास केल्याचा आरोप दिलीप कडू यांनी केला होता. विशेष म्हणजे 20, 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या सुट्टी असताना सुलभा पाटील या विद्यापीठाच्या कोणत्या कामासाठी मंत्रालयात होत्या? असा यक्षप्रश्न दिलीप कडू यांनी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सेनेच्या सभेत उपस्थित केला होता. यावर कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी सिमेंटच्या पुढील बैठकीत या प्रकरणाचा चौकशी अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल असा शब्द दिला होता.