वाशिम - अमरावती-पुणे एक्सप्रेसमधून पडल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना जऊळका रेल्वे याठिकाणी घडली असून त्याची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही.
वाशिममध्ये धावत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू - Imran Khan
अमरावती-पुणे एक्सप्रेसमधून पडून गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अकोल्यावरून वाशिमकडे येत असलेल्या अमरावती-पुणे एक्सप्रेसमधून एक युवक रात्रीच्या सुमारास जऊळका येथे नालीत पडून गंभीर झाला. तो नालीत पडताना जोरात आवाज झाला. त्यामुळे शेजारील शेतात टॅक्टर चालवणाऱ्या शेतकऱ्यांने याबाबतची माहिती जऊळका पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी युवकास उपचारासाठी वाशिम येथे पाठवले. मात्र, हा युवक गंभीर जखमी असल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख अद्याप पटली नसून पुढील तपास जऊळका पोलीस करत आहेत.