अमरावती- जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर येथे गणेश विसर्जनादरम्यान पूर्णा नदीच्या पुलाजवळ गौरखेडा येथील ४ युवक बुडाले होते. यामध्ये तिघांचा शोध लागला. मात्र, एकाचा शोध घेण्यासाठी मंगळवारी नागपूर येथील एसडीआरएफ पथकाची शोधमोहीम सुरू होती. यावेळी अचानक पाण्याच्या वेगाने बोट उलटून बोटमधील ५ जण नदीपात्रात पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून गावकऱ्यांनी व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बोट बाहेर काढली.
अमरावतीच्या पूर्णा नदीत बचाव पथकाची बोट उलटली, सर्व सुखरूप - शुकलेश्वर
गणेश विसर्जनादरम्यान पूर्णा नदीच्या पुलाजवळ गौरखेडा येथील ४ युवक बुडाले होते. त्यापैकी तिघांचा शोध लागला. मात्र, एकाचा शोध घेण्यासाठी मंगळवारी नागपूर येथील एसडीआरएफ पथकाची शोधमोहीम सुरू होती. यावेळी ही घटना घडली.
अमरावतीच्या पूर्णा नदीत बचाव पथकाची बोट उलटली
Last Updated : Sep 18, 2019, 5:13 PM IST