महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गप्पांमध्ये रंगलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटली गोळी, बँक अस्थायी कर्मचारी जखमी - कर्मचारी

सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी गप्पांमध्ये रंगले असताना सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी कर्मचाऱ्याच्या मांडीतून आरपार गेल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : May 31, 2019, 11:52 PM IST

अमरावती- सुरक्षा रक्षक आणि बँकेतील अस्थायी कर्मचारी गप्पात रंगले असताना सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटून कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना श्याम चौक येथील एसबीआय बँकेत आज सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली. उज्वल देशमुख असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.


उज्वल देशमुख हे अकोला मार्गावरील जयप्रभा कॉलनी येथील रहिवासी असून ते एसबीआय बँकेत अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. या बँकेतील सुरक्षा रक्षक शरद महल्ले यांच्याशी उज्वल देशमुख यांनी चांगली मैत्री आहे. आज सायंकाळी दोघेजण बँकेच्या प्रवेशद्वारासमोर गप्पांमध्ये रंगले असताना शरद महल्ले यांच्या हातातील बंदुकीतून अचानक गोळी झाडली गेली. ही गोळी उज्वल देशमुख यांच्या मांडीला लागली. या घटनेमुळे बँक परिसरात खळबळ उडाली.

जखमी उज्वल देशमुख यांना त्वरित झेनीत रुग्णालयात हलविण्यात आले. येथे अतिदक्षता विभागात उज्वल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनरमुळे हादरलेले शरद महल्ले यांनी स्वतः कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन झाल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तापासासाठी शरद महल्ले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे पोलिसांचे मत असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details