अमरावती - जग बदलत आहे या बदलत्या जगासोबत आणि जगाच्या वेगळा सोबत राहण्यासाठी वैज्ञानिक आविष्कारांची प्रचंड गरज आहे. असे नवनवे अविष्कार साकारणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, बुलडाणा,यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापीठाच्या परिसरात आपले अविष्कार सादर केलेत. दोन दिवस चालणाऱ्या आविष्कार स्पर्धेत भारावून टाकणारे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत आयोजीत सोहळ्यात मंगळवारी आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्ध्यांचे प्र-कुलगुरू प्रा. चंद्रकांत रागिट यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
अविष्कार स्पर्धेतील छायाचित्रे या सोहळ्याला संबोधीत करताना कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आज आपण अवकाशात चंद्र आणि मंगळ यांचा शोध घेण्यासाठी धडपडतो आहे. मात्र, जमिनीवरचा शोध जोपर्यंत संपूर्णपणे लागत नाही आणि या अविष्करामध्ये सर्वसामान्य विद्यार्थी सहभागी होत नाही. तोपर्यंत या शिक्षणाचा उपयोग नाही, असे स्पष्ट केले. संशोधन हा स्वभाव होणे गरजेचे असून हा स्वभाव होण्यासाठी आपल्याला समाजामध्ये जागृतपणे वावरावे लागेल, असे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले.
अविष्कार स्पर्धेतील छायाचित्रे हेही वाचा -धक्कादायक..! तरुणाने एचआयव्हीग्रस्त असल्याचे लपवून केला विवाह, अन्...
या स्पर्धेत पृथ्वीवर पसरणारे प्रदूषणावर मात कशी करता येईल. सौरऊर्जेच्या माध्यमातून शेतीची मशागत, तसेच पाण्याची टाकी भरल्यावर मोटार पंप आपोआप बंद होणे आणि पाण्याची पातळी कमी होताच मोटार पंप आपोआप सुरू होणे, असे विविध स्वरूपाचे अविष्कार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत साकारले आहेत. मंगळवारी दिवसभर अविष्कार स्पर्धेतील विविध संशोधन प्रयोग आणि अभ्यास पेपर वाचण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती.
हेही वाचा -IND VS AUS : टीम इंडियावर 'संक्रांत', वॉर्नर-फिंचमुळे कांगारुंचा दणदणीत विजय