अमरावती भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. असे असताना अमरावती शहरात हरघर तिरंगा अभियानाला गालबोट लागले आहे. प्रचारासाठी फिरत असलेल्या वाहनावर शहरातील कॉटन मार्केट परिसरामागे असणाऱ्या हॉटेल आदर्श समोर काही समाजकंटकांनी हल्ला केला. यावेळी या प्रचार रथावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi poster ) आणि विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे ( MP Pravin Pote ) यांच्या छायाचित्रांसह असणाऱ्या हर घर तिरंगा रॅली अभियानाचे पोस्टर पाडले.
हर घर तिरंगा प्रचार रथावर अमरावतीत हल्ला, पंतप्रधान मोदींचे फाडले पोस्टर - हर घर तिरंगा मोहीम यशस्वी
हर घर तिरंगा मोहीम यशस्वी व्हावी यासाठी अमरावती शहरात जनजागृतीसाठी निघालेल्या प्रचार रथावर दोन समाजकंटकांनी हल्ला केल्याची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली आहे. आज हर घर तिरंगा अभियानाच्या प्रचार रथावर जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याचा शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनांची संबंध आहे का, याचा तपास देखील पोलिसांनी करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.
तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटनाअमरावती शहरात गत काही दिवसांपासून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. आज हर घर तिरंगा अभियानाच्या प्रचार रथावर जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याचा शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनांची संबंध आहे का? याचा तपास देखील पोलिसांनी करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.
हा देशाचा अपमानभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हे अभियान यशस्वी व्हावे यासाठी शहरात आमदार प्रवीण पोटे यांच्या माध्यमातून अनेक प्रचार रथ फिरत आहेत. आज एका प्रचार रथावर झालेला हल्ला हा आमदार प्रवीण पोटे किंवा भाजपचा अपमान आहे. हा देशाचा अपमान असल्याचेदेखील शिवराय कुलकर्णी यांनी म्हटले आहे.