अमरावती -अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीचे रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांचा दोन दिवसांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांनी रोहयोचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन करून आपल्यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्याकडून अन्याय होत असल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच, आपली बाजू न ऐकता आपल्याला कार्यमुक्त केल्याचा आरोप करत मी आत्महत्या करत असल्याचे देखील प्रमोद निंबुरकर यांनी म्हटले होते. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान, हा अपघात की आत्महत्या? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख यांनी सभागृहात फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकूण दाखवल्यानंतर आणि ईटीव्ही भारतने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी घेतली असून आता या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा -सायकल पंचर होते म्हणून 'हा' पठ्या चक्क घोड्यावरून जातो शाळेत, वाचा...
काय आहे प्रकरण..?
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील प्रमोद भिमरावजी निंबुरकर हे पंचायत समिती तिवसा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यानच्या काळात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. चेतन जाधव यांनी प्रमोद निंबुरकर यांच्यावर कामात हयगय, अनियमितता, वारंवार सांगूनसुद्धा कामात सुधारणा नाही, कामात दिरंगाई, लोकांची दिशाभूल आदी कारणांचा ठपका ठेऊन त्यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पाठविला होता. उपजिल्हाधिकारी राम लंके यांनीही कुठलीही शहानिशा न करता व बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा दावा निंबुरकर यांनी केला होता. वरुडच्या बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत मोर्शी ते वरुड रोडवर प्रमोद निंबुरकर यांचा दोन दिवसांपूर्वी रस्ते अपघात झाला. हा अपघातात की आत्महत्या ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय आहे गटविकास अधिकारी यांच्या पत्रात?
अमरावतीच्या तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांनी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्यावर कामात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता. त्या संदर्भात त्यांनी रोहयोचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पत्र लिहले होते. यामध्ये प्रमोद निंबुरकर हे स्वतः ऑफिसला उपस्थित न राहता अगोदर स्वाक्षरी करून व खोटा दौरा टाकून ऑफिसला गैरहजर राहत, वारंवार सांगून सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिओ - टॅगिंग प्रलंबित ठेवणे, प्रवीण साहेबराव देशमुख यांची फाईल त्रूटीत असून सुद्धा त्यांना काम करून देतो, असे सांगून दिशाभूल करणे.पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना माझे काम पूर्ण झाले गटविकास अधिकारी यांच्याकडे सर्व कामे प्रलंबित असल्याचे सांगून गटविकास अधिकारी यांच्याविरोधात कार्य करणे. पंचायत समिती कार्यालय तिवसाची बदनामी करणे. संधी देऊनही असमाधानकारक स्पष्टीकरण सादर करणे, कर्तव्य प्रति निष्ठा न ठेवणे आदी बाबी या पत्रात नमूद करण्यात आल्या होत्या.
गौरी देशमुखांनी ऐकवली ऑडिओ क्लिप