महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Navneet Rana criticizes Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारसदार, पण... नवनीत राणांचा खोचक टोला - दसरा मेळाव्यावरून टीका

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील सभेवर Navneet Rana criticizes over Dasara Melava अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी टीका केली Navneet Rana criticizes Uddhav Thackeray आहे.

Amravati MP Navneet Rana
अमरावती खासदार नवनीत राणा

By

Published : Oct 6, 2022, 9:24 AM IST

अमरावती :शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील सभेवर (Navneet Rana criticizes over Dasara Melava) अमरावतीच्याखासदार नवनीत राणा यांनी टीका केली (Navneet Rana criticizes Uddhav Thackeray) आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.


उद्धव ठाकरेंचे संतुलन बिघडले -माझा बाप चोरला, असे वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःचा अडीच वर्षाचा काळ आठवावा. खरंतर उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते बाप चोरला, वगैरे अशी भाषा वापरत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण 40 आमदार आले आहेत. एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील शेकडो शिवसैनिक सभेला उपस्थित होते. उद्धव ठाकरे आपल्या सभेत सिनेमातील संवाद बोलत होते, अडीच वर्ष ते घरातच बसले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची कामे करणार, असे आश्वासन ते देत होते मात्र वास्तवात त्यांनी कुठलेही काम केले नाही. अशी टीका देखील खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांनी केली.

प्रतिक्रिया देताना नवनीत राणा



खरे शिवसैनिक एकनाथ शिंदेंसोबत -बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे एकनाथ शिंदे आहेत. यामुळेच त्यांच्या सभेला हजारोच्या संख्येत गर्दी उसळली. खरे शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंसोबतच असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले (Dasara Melava) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details