अमरावती -गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्यांच्या ( Loudspeaker Controversy ) विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( MNS Agitation Against Loudspeaker ) आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमिवर आज अमरावती शहर मनसेचे ( Amravati MNS File Complaint Against Osmania Mosque Lodspeaker ) पदाधिकारी आणि कार्यकर्ते उस्मानिया मशिदीत होणाऱ्या अजान विरोधात तक्रार देण्यासाठी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात ( MNS Agitation In City Kotwali Police Station ) गेले होते. मात्र, शहर कोतवाली पोलिसांनी या तक्रारीची दखल घेण्यास नकार दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले.
मनसे कार्यकर्त्यांकडून तक्रार - अमरावती शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असणाऱ्या उस्मानिया मशिदीवर लागलेल्या भोंग्यांवरून बुधवारी दुपारी दीड वाजता अजान दिली जाते. हा आवाज अतिशय कर्कश असून यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. कुठलाही परवानगीविना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करून या भोंग्यांचा वापर करण्यात येतो, अशी तक्रार मनसेचे जिल्हा संघटक पप्पू पाटील, पक्षाचे महानगरप्रमुख संतोष बद्रे, धीरज तायडे, प्रवीण डांगे, वृंदा मुक्तेवार, मनविसेचे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज सकाळपासून विविध मशीद परिसरात मशिदीवर लागलेल्या भोग्यांचा आवाज तपासत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी ही तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच आंदोलन सुरू केले.