अमरावती/दिल्ली - अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर 9 जानेवारी रोजी राजापेठ अंडरपास येथे शाई फेक झाल्याच्या ( Throw Ink Municipal Commissioner Amravati ) प्रकरणाशी माझा काहीएक संबंध नाही. केवळ मुख्यमंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्र्यांच्या दबावामुळे पोलिसांनी या प्रकरणात माझ्या विरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला ( Ravi Rana Allegation Cm Thackeray ) आहे. मी फरार झालेलो नाही मला अटकच करायचे आहे तर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्लीला पाठवावे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली ( Ravi Rana On Ink Throw Case ) आहे.
मतदार संघाच्या विकासकामांसाठी मी दिल्लीत
अमरावती जिल्ह्यातील अनेक विकासकामांच्या संदर्भात मी अनेक दिवसांपासून दिल्लीला आलो आहे. मी दिल्लीला कधीपासून आलो याबाबतची बोर्डिंग पास ही मी पोलिसांना पाठवली आहे. रेल्वे मंत्रालयात जिल्ह्याशी निगडीत महत्त्वाच्या विषयांवर माझी बैठक होती. आज सुद्धा महत्त्वाच्या कामानिमित्त मी दिल्लीतच आहे, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.