अमरावती -अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमधील आदित्य काळमेघ या विद्यार्थ्यांने शाळेची पूर्ण प्रवेश फी भरली नाही, म्हणून त्याला दहावीमध्ये केवळ 52 टक्के मार्क दिल्याचा धक्कादायक प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शाळेवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. परंतु दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा महर्षी पब्लिक स्कूलवर शिक्षण विभागाने कुठलीही कारवाई केले नसल्याने आदित्य काळमेघ हा १५ वर्षीय विद्यार्थी दोन दिवस उपोषणाला बसला होता.
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीदरम्यान राडा; महर्षी पब्लिक स्कूलवर कठोर कारवाईची मागणी - महर्षी पब्लिक स्कूल
अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमधील आदित्य काळमेघ या विद्यार्थ्यांने शाळेची पूर्ण प्रवेश फी भरली नाही, म्हणून त्याला दहावीमध्ये केवळ 52 टक्के मार्क दिल्याचा धक्कादायक प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आज उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात बैठक सुरू असतानाच भाजप, मनसे व शाळा व्यवस्थापन समितीच्या लोकांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान या विद्यार्थ्याला न्याय देऊन शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी यांनी दिली. दरम्यान आमचे शिक्षण विभागही जुमानत नसल्याची खंत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली असून त्यांनी माफी मागितली आहे. दरम्यान या शाळेवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा शिक्षण विभागाला दिले आहेत.
हे ही वाचा -VIDEO : खासदार नवनीत राणांनी घेतला गरब्याचा आनंद; व्हिडिओ व्हायरल